टेंभुर्णी (प्रतिनिधी ) जमुनाबाई बाळाराम काबरा विद्यालयात 300 वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जमीर शेख यांनी तर प्रमुख पाहुणे म्हणून मधुकर निकम, ऑ. प्रेमसुखकाबरा, प्रा. दत्ता देशमुख, विष्णू सांगुळे, गणेश
पंडीत यांची उपस्थिती होती.यावेळी बोलतांना डॉ. प्रदिप पंडीत म्हणाले कि, पर्यावरणाचा ऱ्हास होत असून निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी वृक्ष लागवड करण्याचा उपक्रम राबविले जात आहे.अध्यक्षीय समारोप करतांना जमीर शेख यांनी पंडीतपरिवाराच्या या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी नवभारत शिक्षण संस्थेच्यावतीने पंडीत परिवाराचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य लक्ष्मीकांत बुकदाने, डॉ. प्रदिप पंडीत, डॉ.सौ. पंडीत, तारा पंडीत, वासुदेव देव्हडे, विद्या देव्हडे, युगंधरचे अध्यक्ष विनोद कळंबे, व्यापारी महासंघचे अलकेश सोमाणी, आढावे, डॉ. अविनाश सुरुशे, डॉ.शिवहरी साळवे, प्रा. मधुकर झटे, दिनकर उखर्डे, नंदकुमार काळे,पंजाब सोळुंके, दिलीप उभरहंडे, धनंजय पुराणे, प्रा सुनील बनसोडे,डॉ. प्रशांत काबरा, प्रा कैलास जाधव, प्रा. रामदास भांगे, संजय कुलकर्णी, गणेश सावसक्के, राजेश शेवाळे, कैलास भुतेकर, प्रा. अरुण आहेर, रविंद्र मोरे, पंडीत सुरुशे, प्रा गजानन धोटे, दत्ता उखर्डे, रमेश इंगळे, राजेंद्र जगताप, श्री क्षीरसागर, माधुरी उखर्डे, श्रीमती भिलावेकर, श्रीमती लंबे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भिवसन ससाणे यांनी केले
तर आभार प्रदर्शन नंदकुमार काळे यांनी मानले.