मुंबई (वृत्तसंस्था) – आरोप प्रत्यारोपांनी समाजाचे प्रश्न सुटत नाही तर चर्चेने सुटतात. त्यासाठी राजकीय झुल बाजूला ठेवावी लागेल. उपेक्षित ओबीसी समाजाला न्याय येण्यासाठी सर्व नेत्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. उद्या सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार, अभिषेक मनू सिंघवी मांडणार राज्य सरकारची बाजू मांडणार आहेत. केंद्र सरकारकडून इम्पेरीकल डेटा मिळावा, यासाठी केंद्राला निर्देश द्यावे, आणि जोपर्यंत इम्पेरीकल डेटा मिळत नाही तोपर्यंत राज्यातल्या निवडणूका पुढे ढकलाव्यात, या मागण्या याचिकेत करणार आहे. ओबीसीचं नुकसान होता कामा नये, असं मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. मराठा, ब्राम्हण समाज एकत्र आहे, पण ओबीसी समाज विविध जातीत विभागलाय. यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार, एकत्र येऊन दबाव टाकला, तर प्रश्न सोपे होतील. प्रश्न सुटले नाही तर गरज भासल्यास ओबीसी समाज संघर्षासाठी तयार आहे, असंही ते म्हणाले.








