मुंबई (वृत्तसंस्था) ;-मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी गोर बंजारा ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा डॉ. ऐश्वर्री यश राठोड यांनी केली आहे.
हरितक्रांतीचे प्रणेते महाराष्ट्र मध्ये हरितक्रांतीची एक प्रकारची लाट आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी सर्वस्वी झटणारे, त्या काळाचे असलेले 15 वर्ष मुख्यमंत्री पद भूषविणारे स्वर्गीय माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी सिडको आणि तसेच नवी मुंबईची निर्मिती आणि निर्माण करण्याची संकल्पना ही स्वर्गीय माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची होती. संपूर्ण भारतामध्ये 20 कोटी समाज असून या समाजाची मागणी आहे, कि आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय वसंतराव नाईक यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी डॉ. राठोड यांनी केली आहे.








