जळगाव (प्रतिनिधी ) ;- सुप्रसिध्द व्याख्याते व लेखक डॉ संतोष पाटील गोराडखेडेकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त महामानवांच्या पुस्तकांचे वाटप केले . दैनंदिन जीवनात जगत असताना सर्वच जण आपला वाढदिवस केक कापून किंवा पार्टी करून साजरा करत असतो परंतु डॉ पाटील यांनी आपला वाढदिवस विभिन्न महामानवांचे पुस्तकं मुलांना मोफत मध्ये देऊन साजरा केला व एक नवा आदर्श प्रस्थापित केला . त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज , डॉ बाबासाहेब आंबेडकर , क्रांतिसूर्य ज्योतिराव फुले , क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले , राजमाता जिजाऊसाहेब , अण्णाभाऊ साठे यांची गोष्टी रूपये पुस्तके बालगोपालांना वाटली . व आयुष्यात जगण्यासाठी त्यांच्या आदर्श विचार आपल्या जीवनात बाळगा असे आवाहन केले . सर्वांनीच आपला वाढदिवस महामानवाची विचार रुपी पुस्तके वाटून व त्या विचारांचा प्रचार व प्रसार करून साजरा केल्यास येणारी भावी पिढी सुखकर व आनंददायी आयुष्य जगेल असे त्यांनी बोलून दाखवले . याप्रसंगी रामेश्वर पाटील , केदार कुलकर्णी , तन्मय पाटील , प्रथमेश पाटील , पंकज साबळे , धैर्यशील पाटील आदी उपस्थित होते.








