जळगाव (प्रतिनिधी ) येथील डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील चौथ्या मजल्यावरील कैदी वार्डातून उपचारादम्यान खिडकीची जाळी तोडून कैदी शंकर रविंद्र चौधरी उर्फ रहिम नज्जू पठाण वय २० रा. शिवकॉलनी धर्माराव कुुंडीचाळ, चाळीसगाव याने पलायन केल्याची घटना आज शनिवारी पहाटे पावणे पाच वाजेच्या सुमारास घडली. याबाबत हेकॉ सुरेश सपकाळे यांच्या फिर्यादीवरुन नशीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.