चोपडा ;- ओबीसी समाजाला पुन्हा राजकीय आरक्षण मिळावे या मागणीसाठी तसेच याला जबाबदार राज्य सरकारच्या निषेधार्थ भाजपा चोपडातर्फे येथे ‘चक्काजाम आंदोलन’ करण्यात येऊन तहसिलदार चोपडा यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तालुक्यातील भाजपा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.