जळगाव;- जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा जळगाव बाजार समितीचे माजी सभापती बळीरामदादा सोनवणे यांचे आज सायंकाळी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
बळीरामदादा सोनवणे (वय ८५) हे जळगाव तालुक्यासह सहकार क्षेत्रातील एक मातब्बर व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जातात. आज सायंकाळी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. ते माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचे वडील तर आ. लताताई सोनवणे व माजी महापौर राखीताई सोनवणे यांचे सासरे होत. त्यांच्या पश्चात चार मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.