जळगाव;- तालुक्यातील आसोदा गावाकडे जाणाऱ्या असोदा रेल्वे गेटजवळ एका ५५ वर्षीय व्यक्तीने धावत्या रेल्वेखाली स्वताला झोकून देत आत्महत्या केल्याची घटना आज घडली असून यामुळे खळबळ उडाली आहे. यशवंत हेमराज चौधरी (वय ५५, रा. जुना खेडी रोड) असे मयत व्यक्तीचे नाव असून त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अप लाईनवरील खंबा क्रमांक ४२१/२५-२८ दरम्यान यशवंत चौधरी यांनी धावत्या रेल्वे गाडी खाली येत आत्महत्याकेली असून त्यांच्या खिशात सापडलेल्या डायरीवरून ओळख पटली. व्यक्तीच्या खिशात असलेल्या डायरीवरून त्यांची ओळख पटविण्यात आली. या बाबत शनिपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांचे मृतदेह जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आला. शनिपेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.