जळगाव ;- येथील शिकोलनी भागात अज्ञात चोरटयांनी बंद घराचे कुलूप तोडून आतील कपाटातून दागिने आणि रोकड असा एकूण सव्वा लाखांचा मुद्देमाल लांबविल्याची घटना उघडकीस आली असून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, लता मधुकर महाजन ह्या २२ जून रोजी मुलगा आणि मुलगी समवेत नातेवाईकांकडे पुण्याला गेले. दरम्यान, २२ जून रात्री ८.३० ते २४ जून दुपारी १.३० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातील १ लाख ५ हजार रूपये किंमतीचे ३५ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि १५ हजाराची रोकड असा एकुण १ लाख २० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. लता महाजन यांच्या लहान बहिणीचे पती मदन तुकाराम माळी यांनी पोलीसांना कळविले. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून घटनेचा पंचनामा केला. दरम्यान मदन माळी यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पो.कॉ. उषा सोनवणे करीत आहे.