भुसावळ ;- मध्य प्रदेशातून भुसावळ येथे मावशीकडे शिक्षणासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर मामा आणि मावशानेच अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली. या प्रकरणी गुरुवारी पीडित मुलीची मावशी, मावसा व मामाविरूद्ध बाजारपेठ पोलिस ठाण्यात पोस्को कायद्यासह अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला. २१ जून २०२१ च्या सात महिन्यांपूर्वी हे अत्याचार झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
बऱ्हाणपूर येथून १७ वर्षीय मुलगी सात महिन्यांपूर्वी भुसावळ शहरातील नेमाडे कॉलनीतील रहिवासी तिची मावशी प्रमिला संतोष गिरी हिच्याकडे शिक्षणासाठी आली होती. या दरम्यान तिचा मावसा संतोष लागीर गिरी याने तिचा विनयभंग केला. मावसाचे हे कारनामे मुलीने तिच्या मावशीला सांगितले. मात्र, मावशीने दुर्लक्ष केले. यानंतर अल्पवयीन मुलीला शहरातच राहणारा तिचा भाऊ (पीडित मुलीचा मामा) संतोष वामनराव भारती याच्याकडे राहण्यासाठी पाठवले. मात्र, तेथेही मामाने सलग सात महिने तिच्यावर अत्याचार केले. ही बाब कुणालाही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. मात्र, पीडित मुलीने गुरुवारी (दि.२४) बाजारपेठ पोलिसांत फिर्याद दिली. यानुसार मावसा संतोष लागीर गिरी (वय ५३ रा.खडका रोड, नेमाडे कॉलनी, भुसावळ), मामा संतोष वामनराव भारती (वय ३८, रा.खडका रोड, पाटील मळा, भुसावळ) आणि मावशी प्रमिला संतोष गिरी (वय ४८) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. यापैकी संतोष गिरी व संतोष भारती यांना अटक झाली. पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय गणेश धुमाळ, सुभाष साबळे हे गुन्ह्याचा तपास करत आहेत.