जळगाव;- मेहरूण तलाव परिसरात असणाऱ्या जेके पार्क येथे दोन जणांनी काहीही कारण नसताना घंटागाडीवर चालक असणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यात दगड टाकून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून दोन अनोळखी व्यक्ती पसार झाले.
प्रभाकर महाजन (वय-५५) रा. मेहरूण हे यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास शहरातील जे.के.पार्क या ठिकाणी त्यांचे आणि त्यांच्या नात्यातील एका महिलेशी आपापसातील सुरू असलेला वाद शाब्दिक चकमक सुरू होता. दरम्यान, त्याच ठिकाणी अनोळखी दोन व्यक्ती यांना महिलेची छेडखानी होत असल्याचा गैरसमज झाला. त्यानी प्रभाकर महाजन यांना काहीही न विचारलात शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. यात झटापटीत महाजन हे काही सांगण्याच्या आत एकाने त्यांच्या डोक्यात दगड टाकला. त्यात ते गंभीर जखमी झाले. हा प्रकार घडल्यानंतर दोन्ही संशयित अनोळखी घटनास्थळाहून फरार झाले होते. जखमी अवस्थेत प्रभाकर महाजन यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी अद्यापपर्यंत पोलीसात गुन्हा दाखल झालेला नव्हता. दरम्यान, महापौर पती तथा गटनेता सुनिल महाजन यांनी जखमीची भेट घेवून विचारपूस केली .