गावराणी जागल्या संघटनेची मागणी
अमळनेर ;- कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतीमाल विक्रीस आल्याने शेतकऱ्यांनी एकदम गर्दी झालेली आहे. परिणामी आपल्या निदर्शनास आलेल्या बाबींच्या अनुषंगाने कोरोना विषाणुचा पादुर्भाव रोखणे संदर्भातील काही अटींचा भंग होणे ही बाब साहजिकच मान्य व कबुल आहे. परंतु जर अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्याच्या संदर्भात अमळनेर गणनिहाय क्रमा-क्रमाने शेतमाल खरेदी-विक्री करणे बाबतच्या अमळनेर
कृषी उत्पन्न बाजार समितीस परवानगी संदर्भातील कार्यपध्दतीचा अवलंब करण्यात आल्यास शेतमाल विक्री
करणाऱ्या शेतकऱ्यांची गर्दी देखील आटोक्यात येईल. व शेतमाल खरेदी-विक्री व्यवहार सुरू राहील्याने शेतकऱ्यांवरील अन्याय देखील काही प्रमाणात दूर होईल, असे मत गावराणी जागल्या या संघटनेने जिल्हाधिकारी यांना पत्रांद्वारे कळविले आहे.
सदर पत्रात ,जळगाव जिल्ह्यातील कष्टकरी व हतबल वर्गवारीतील शेतकऱ्यांना न्याय मिळावा व शेतकऱ्यांचा सहानुभूती व मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करून जळगाव शहर/ अमळनेर/भुसावल/चाळीसगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील शेतमालाचे खरेदी-विक्री व्यवहार करणेस आपल्या स्तरावरून आदेशान्वये परवानगी देण्यात आलेली होती.मात्र प्राधिकारी या नात्याने आपणास असणाऱ्या अधिकारांच्या अधिन राहात आपण पूनश्चः कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील खरेदी-विक्री व्यवहार बंद करणे संदर्भातील आदेश पारीत
केलेले आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतमालाचे कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील खरेदी-
विक्री व्यवहार पूनश्च बंद करण्यात आलेले आहे. परिणामी ‘बुडत्याला काडीचा आधार’ या उक्तीप्रमाणे जगण्याची थोडीफार सुध्दा आशा व उर्मी जागृत असलेल्या जळगाव जिल्ह्यातील शेतकरी पूनश्चः खचलाअसुन हवालदील झालेला आहे अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीस शेतमाल खरेदी-विक्री व्यवहार सुरू करणेस आपण सहानुभूतिपूर्वक विचार करत अनुमती देणेबाबत विचार करावाअमळनेर तालुक्यात एकुण १० (दहा) पंचायत समितीचे गण व अमळनेर शहर अशी शेतकऱ्याची वर्गवारी विचारात घेत आपणास योग्य वाटेल अश्या क्रमावारीने अमळनेर कृषी उत्पन्न बाजार
समितीत शेतमाल खरेदी-विक्री व्यवहारास आपल्या स्तरावरून अनुमती देण्यास आपल्या अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांची झालेली गर्दी आटोक्यात येईल. व परिणामी आपणास अपेक्षित असलेल्या कोविड-१९ (कोरोना) विषाणुचा पार्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या-त्या सर्व उपाययोजनांची पुर्तता होणे तसेच आपल्या स्तरावरील आदेशांचे व सूचनांचे पालन करणे अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीतील देखील सोयीचे होईल. एवढेच नव्हेतर अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल खरेदी-विक्री व्यवहारास सदरील सूचित केलेल्या टप्याटप्याने क्रमवारीनुसार सुरू राहिल्यास अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना देखील शेतमाल विक्रीच्या माध्यमातून आर्थिक आधार मिळेल व त्यांच्यासमोरील आर्थिक व मानसिक त्रस्ततेच्या प्रश्न देखील काही प्रमाणात मार्गी लागेल, तरी आपल्या स्तरावरून या पत्रातील नमुद आशयाचा शेतकरी हितार्थ हेतुने तसेच कष्टकरी वर्गवारीतील शेतकऱ्यांना आपल्या स्तरावरून मदतीचा हात या नात्याने सहानुभूती व मानवतेच्या दृष्टिकोनातुन विचार करून पुनश्चः विशिष्ट योग्यत्या अर्टीच्या शर्तीच्या अंमलबजावणी संदर्भातीलबाब निदर्शनास आणुन देत अमळनेर तालुक्यातील गणांच्या क्रमवारी निहाय अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीतशेतकऱ्यांच्या मालाच्या खरेदी-विक्रीस आपल्या स्तरावरून अनुमती देणे संदर्भातील बाब आदेशित होणे बाबतचे सहकार्य व्हावे ही आपणास नम्र विनंती, अश्या आशयाचे पत्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास पाटील यांनी दिले आहे.