साला गंभीर ; आरोपीला अटक
जळगाव (प्रतिनिधी ) ;-धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील माहेर असणाऱ्या ३० वर्षीय महिलेवर पतीची पोलिसात तक्रार दिल्याचा राग येऊन तिच्या पतीने चाकूने वार करून हत्या केल्याची घटना आज २३ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली असून पत्नीच्या भाऊला घरी जाऊन आरोपीने त्याच्यावरही वार करून गंभीर जखमी केले . पूजा सुनील पवार वय २६ असे मयत महिलेचे नाव आहे. शिवाजीनगर ,जळगाव येथे सासर असलेल्या पूजा पवार हिचे सुनिल बळीराम पवार वय ३४ याच्याशी विवाह झाला असून दोघान्मध्ये कौटुंबिक वाद असल्याने फेब्रुवारी महिन्यापासून पाळधी येथे माहेरी आली होती. मात्र २२ रोजी पतीविरुद्ध पाळधी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्याने सुनील पवार याला बोलविण्यात आले होते. पत्नीने तक्रार दिल्याचा राग मनात ठेऊन आज दुपारी पाळधी येथील मारवाडी गल्ली येथे पत्नी पूजावर सपासप चाकूने वार करून ठार केले. यानंतर साला शंकर भिका चव्हाण वय २० याचे घर गाठून त्याला चाकूने भोसकून गंभीर जखमी केले. या घटने प्रकरणी पोलिसांनी आरोपी सुनील पवार याला अटक केली आहे. घटनेची माहिती कळताच जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी रुग्णालयात भेट दिली . दरम्यान मयताच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात एकच आक्रोश केला. मयत पूजाच्या पश्चात भाग्यश्री, भावना मुलगा ओम तीन अपत्य आणि ५ बहिणी आणि एक भाऊ असा परिवार आहे.