जळगाव ( प्रतिनिधी ) ;- परिसरातील अवैध धंद्याविरोधात कारवाई न करण्यासाठी तसेच वॉरंटची अंमलबजावणी न करण्यासाठी अडीच हजारांची लाच मागणार्या पाळधी औटच्या पोलीस नाईकासह होमगार्डला जळगावच्या लालाचलुचपत विभागाच्या पथकाने बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास लाच स्वीकारताच अटककेली आहे. पोलीस नाईक किरण सपकाळे व होमगार्ड सोनवणे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस उपअधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजोग बच्छाव सफौ.दिनेशसिंग पाटील,पोहेकॉ.अशोक अहीरे, पोहेकॉ.सुनिल पाटील, सफौ.सुरेश पाटील, पोहेकॉ.रविंद्र घुगे, पोना.मनोज जोशी, पोना.सुनिल शिरसाठ, पोना.जनार्धन चौधरी, पोकॉ.प्रविण पाटील, पोकॉ.नासिर देशमुख, पोकॉ.ईश्वर धनगर, पोकॉ.प्रदिप पोळ, पोकाॅ.महेश सोमवंशी. कर्मचाऱ्यांनी हि कारवाई केली.