वडती ता.चोपडा ;- भाडेतत्त्वावर घेतलेल्या दोन बोअरवेलचे भाडेपोटेची मिळणारी रक्कम न देता उलटपक्षी दोन्ही ट्रक मालकाच्या ताब्यात न देण्याऱ्या आरोपीला चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस पथकाने फसवणुकीच्या गुन्ह्यातील अपहार झालेल्या दोन बोअरवेलच्या ट्रक मध्यप्रदेश राज्यातील शिवनी जिल्ह्यातील चिखली या गावातुन शिताफीने जप्त केल्या आहेत. संबंधित गुन्ह्यातील आरोपीस अटक जेलची हवा दाखवली आहे. त्याला दोन दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली आहे.
चोपडा येथील सहयोग कॉलनी येथील रहिवाशी असलेले बोअरवेल व्यवसायिक वल्लभ पटेल यांच्याकडून आरोपी राजाराम चंद्रवंशी याने मौखिक करारानुसार मासिक भाडेतत्वावर बोअरवेलच्या दोन ट्रक व्यवसायाकरीता नेल्या.मात्र झालेल्या मौखिक करारानुसार आरोपीने फिर्यादी वल्लभ पटेल यांना कुठल्याही प्रकारचे देणे केले नाही.म्हणुन फिर्यादी वल्लभ पटेल यांनी आरोपी राजाराम चंद्रवंशी यास संपर्क केला असता तो टाळाटाळ करीत होता.असे निदर्शनास आले असता फिर्यादी वल्लभ पटेल हे स्वतः आरोपीच्या मध्यप्रदेश येथील राहत्या घरी गेले असता त्याने ठरलेले भाडे व फिर्यादीच्या मालकीच्या असलेल्या दोन बोअरवेल ट्रक देण्यास नकार दिला.व उलट माझेच तुमच्यावर पैसे निघतात असे सांगून परतावून लावले.
त्यामूळे फिर्यादी यांनी सदर बाब हि चोपडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्या निदार्शनास आणुन दिली.व दि.15/06/2021 रोजी गुरन 209/2021 भादवि कलम 406,420 प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.व तपास पोलीस नाईक संतोष पारधी यांच्याकडे देण्यात आला.या तपासकामी शहर पोलीस स्टेशनची टिम मध्यप्रदेश येथील शिवनी जिल्ह्यातील चिखली या गावी जाऊन आरोपी राजाराम चंद्रवंशी व अपहार झालेल्या दोन बोअरवेल ट्रक असा एकुण 35 लाख 25 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.आरोपीला दोन दिवसाच्या ट्रांझिड रिमांडनंतर चोपडा येथे आणण्यात आले.आता आरोपीला दोन दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली असुन तो चोपडा येथील जेलमध्ये आहे.