जळगाव (प्रतिनिधी ) वॆशाख ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी यादिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा झाला होता. आज मेहरूण तलाव परिसरात असणाऱ्या शिवाजी उद्यान येथे तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा आज २३ रोजी सकाळी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला .
यावेळी मेहरूण येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारकच्या परिसरात असलेल्या महाराजांच्या स्मारकास गो सेवक शरद पवार यांच्या हस्ते दुग्धाभिषेक करून पुजन केले. यावेळी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हाप्रमुख आकाश फडे , हरीश भाऊ कोल्हे, देवेन भावसार,अप्पा शुक्ल गुरुजी,योगेश्वर जोशी गुरुजी, दीपक दाभाडे,कपिल ठाकूर,राहुल सोले, तुषार नेमाडे,विजय कासार ,राहुल गवळी, अजय गवळी, सोमनाथ धनगर भावेश सोनार,निलेश पाटील, आकाश चौधरी ,युवराज लोहार ,अनिकेत चौधरी ,चारुदत्त विसपुते ,मनीष पांडे ,विशाल जाधव, जयेश हटकर ,राहुल भोई, राहुल शिंदे ,विशाल राजपूत व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.