जळगाव (प्रतिनिधी ) शहरातील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर अवैध दारू तयार केली जात असल्याने एमआयडीसी पोलिसांनी आज मोठ्या बंदोबस्तासह धाडसत्र राबवून १० जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून त्यांच्याकडून अवैध दारू बनविण्यासाठी लागणारे रसायन, साहित्य असा एकूण १ लाख ८६६ हजारांचा मुद्देमाल उद्वस्थ करण्यात आला.
याबाबत पुढील संशयित अवैध दारू बनवितांना आढळून आले. राजेश माचरे वय ८० रा. संजयगांधी नगर १५,७२०, संजय नेतलेकर वय ६६ रा.जखनीनगर १३, ६०० , उमेश तांबट वय ३० रा. कसमवाडी -१९ ,८०० , राजेश भाट वय ५२ रा. नवल कॉलनी १७,५०० , वनाबाई बाटूगे वय ७५ रा. जाखनी नगर १५,५००,
नैनिता गुमाने वय ४९ रा. जाखनी नगर १७,०००, विमलबाई शंकर बागडे वय ५० ,रा. जाखनी नगर २४,०००,इंदुबाई बागडे वय ५० १४,६००,उमेश नेतलेकर वय २१, रा. संजय गांधी नगर १५,५०० , बेंबीबाई नेतले वय ६३ रा. संजय गांधी नगर ३३,२५०असं एकूण १ लाख ८६ हजारांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.