जळगाव – गेल्या दहा हजार वर्षापासून भारत देशात योग प्रचलित आहे. योगाचे वैशिष्ट्ये हे आहे की, तुम्ही युवक असोत वा वृद्ध असोत, निरोगी असोत वा आजारी असोत योग सर्वांना प्रगती पथाकडे घेऊन जातो, हे महत्व जाणून २१ जून हा दिवस जागतिक योग दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त सोमवारी सकाळी गोदावरी फाऊंडेशन संचलित विविध शैक्षणिक संस्थांंमध्ये जागतिक योग दिवस साजरा करण्यात आला.
गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी नर्सिंग महाविद्यालय, फिजीयोेथेरपी महाविद्यालय, विधी व विज्ञान महाविद्यालय, आयएमआर महाविद्यालय, संगीत महाविद्यालय, कृषी आणि कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, अन्न व तंत्रज्ञान महाविद्यालय, भुसावळ, सावदा सीबीएसई इंग्लिश मिडीयम स्कूल, फॅशन टेक्नॉलॉजी महाविद्यालय आदि शैक्षणिक संस्थांमध्ये जागतिक योग दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
डॉ.उल्हास पाटील होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालय
गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालयात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी साजरा करण्यात आला. गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरुड यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.
यावेळी महिला पतंजली योग समिती, भुसावळच्या महानंदा पाटील, भवरलाल प्रजापती, राजश्री बादशाह ह्या सदस्यांचे सहकार्य लाभले. यावेळी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, होमिओपॅथी अभ्यासक्रमाचे १०८ विद्यार्थ्यांनी योगा अभ्यासक्रमाचा लाभ घेतला. यावेळी होमिओपॅथी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिलीप बी पाटील, ललित महाजन, अमोल चोपडे यांच्यासह विद्यार्थी कार्यकारिणी समितीती उपाध्यक्ष ककमलेश सोनवणे, आदिती पाटील तसेच सर्व वर्ग प्रतिनिधी, प्राध्यापक वृंद, डॉक्टर्स उपस्थीत होते.
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात २१ जून हा योग दिवस ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर प्रा.महेश पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांना, शिक्षक व शिक्षकेत्तर यांना योगाच्या सर्व प्रकारांची इतंभुत माहिती दिली व या योग प्रकार केल्याने कोणकोणत्या व्याधीन पासुन दुर राहु शकतो, याचे सविस्तर माहिती दिली. यावेळी योगाचे प्रात्याक्षिक करण्यात आले. यात ताडासन, वृक्षासन, उत्कटासन, पादहस्तासन, वज्रासन, मडुंकासन तसेच भस्त्रीका, कपालभाती, बाह्य, अनुलोम विलोम, भ्रामरी आदि प्राणायाम करण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी प्रतिसाद नोंदविला.
गोदावरी शाळेत आंतराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा
डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल, जळगाव
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे शिक्षण विभाग जिल्हा परिषद जळगांव जिला क्रीड़ा अधिकारी कार्यालय जळगांव व गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल जळगांव यांच्या संयुक्त विद्यमाने आज आंतराष्ट्रीय योग दिवस ऑनलाइन झूम मीटद्वारे साजरा करण्यात आला. यात पहिली ते दहावीतील २८२ विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला.
तत्पूर्वी १४जून रोजी जळगांव शहर महानगर पालिका क्षेत्र सर्व मुख्याध्यापकांची ऑनलाइन (झूम मीट)द्वारे जिल्हा क्रीड़ा अधिकारी कार्यालय व जळगांव जिल्हा हौशी योग संघटना द्वारा सर्व मुख्याध्यापक यांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर शाळेतील मुख्याध्यापकानी आपल्या शिक्षकांना ऑनलाइन प्रोटोकॉल नुसार प्रशिक्षण दिले. दिनांक १७ ते २० जून दरम्यान शिक्षकांनी आप-आपल्या वर्गातील मुलांसाठी प्रशिक्षण शिबीर आयोजित केले. सोमवारी सकाळी ७ ते ८ वाजता २८२ विद्यार्थ्यांची उपस्थिति ऑनलाइन प्रोटोकॉल नुसार योग दिवस साजरा करण्यात आला. तसेच ८ ते ९ वाजता शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे योग सत्र घेण्यात आले.
गोदावरी शाळेच्या प्राचार्यानी सर्व सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने प्रमाणपत्र देण्याची घोषणा केली. यशस्वीतेसाठी प्राचार्य नीलिमा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली योग प्रशिक्षक रंजना कदमबांडे व प्रतिभा बडगुजर तसेच क्रीडाशिक्षक सत्यनारायण पवार, कांचन राठोड, प्रा. आसिफ खान तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.