जळगाव (प्रतिनिधी) ;- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्यावतीने सोमवार दि.२१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ऑनलाईन कार्यक्रम घेण्यात आला.
झूमअॅपद्वारे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी प्रभारी प्र-कुलगुरू प्रा.बी.व्ही.पवार, प्रभारी कुलसचिव डॉ.एस.आर.भादलीकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी ओमकार स्तवनाच्या माध्यमातून ओमकार पुजन करण्यात आले. प्रास्तविकात प्रा.बी.व्ही.पवार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योगाचे महत्व वाढले असून विद्यापीठातील योगा केंद्राच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जाणार असल्याचे सांगीतले. योग दिना पुरते योगाचे महत्व लक्षात न घेता निरामय आरोग्य व प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी योगाचा स्वीकार करावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी प्रा.डॉ.लिना चौधरी व योग शिक्षक गौरव जोशी यांनी योगाची प्रात्यक्षिके सादर केली. योगा मार्गदर्शन केंद्राचे प्रमुख व विद्यापीठ उप अभियंता इंजि. राजेश पाटील यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले. यशवंत गरूड यांनी आभार मानले. डॉ.सोमनाथ वडनेरे, हिमंत जाधव, सुनील चव्हाण, भिकन पाटील, डी.बी.सोनवणे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. या कार्यक्रमाचा ४०० जणांनी लाभ घेतला.