वॉशिंग्टन: चीनच्या नौदलाच्या वाढत्या समुद्री ताकदीचासामना करण्यासाठी अमेरिकेच्या लष्कराने आपल्या सर्वात नव्या एअरक्राफ्ट कॅरिअरवर भयंकर बाँब हल्ल्याचा (bomb attack) परिणाम पाहण्यासाठी परीक्षण केले. अमेरिकेच्या नौदलाने समुद्राच्या आत भयंकर स्फोटाचा व्हिडिओ जारी केला आहे. साधारण 18 हजार किलोच्या या महाकाय बाँबचा स्फोट एअरक्राफ्ट कॅरिअर गेराल्ड फोर्डजवळ समुद्रात पाडण्यात आला ज्यामुळे पाण्याच्या आत जोरदार स्फोट झाला आणि भूकंप झाला.
अमेरिकेच्या नौदलाने याला फुल शिप शॉक ट्रायल म्हटले आहे. माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार या स्फोटामुळे समुद्राच्या आत 3.9 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. अमेरिकेच्या नौदलाने गेल्या शुक्रवारी सांगितले की हे परीक्षण फ्लोरिडाच्या डायटोना समुद्रकिनाऱ्यापासून 100 मैल अंतरावर करण्यात आले. तज्ञांनी म्हटले आहे की अशाप्रकारचे परीक्षण ही एक असामान्य घटना आहे.