मालेगाव ;- येथे पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले यांचे रिडर पोलीस उपनिरीक्षक अजहर शेख यांनी स्वत:च्या सर्व्हिस रिव्हाल्वरने गोळी झाडून आत्महत्या केली. शनिवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास नियंत्रण कक्षातील महिला समुपदेशन केंद्रासमोरील झाडाखाली घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.मात्र यामुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.दरम्यान मयत उपनिरीक्षक अझहर शेख हे शिवाजी नगरातील उस्मानिया पार्क येथील रहिवाशी असून त्यांची सासरवाडी शिवाजीनगर येथील असल्याचे कळते . त्यांच्या कुटुंबात काही वाद होते मात्र ते दोन वर्षांपूर्वी मिटले असल्याची माहिती असून त्यांचे वडील पोलीस दलातून रिटायर्ड झाले असून दोन भाऊ मुंबई पोलीस दलात असल्याचे कळते .