टेंभुर्णी;- माहेश्वरी समाज हा महेश नवमी हा कार्यक्रम मोठ्या उत्स्वात करत असत मात्र या वर्षी कोरोनाची परिस्तिथि अजुनही पाहिजे तशी सुधारली नाही म्हणून साधेपणाने ही महेश नवमी या समाज कडून साजरी करण्यात आली.
आज सकाळी महेश नवमी निमित्य येथील महादेवच्या मंदिरमध्ये सुभाष काबरा यांच्या कडून सह पत्नीक अभीषेक करण्यात आला व पूजा अर्च्या करण्यात आली. या वेळी छोट्या खानी कार्यक्रमाला घनशामदास काबरा, डॉ गंगाबिसन काबरा, माझी तालुका अध्यक्ष अलकेश सोमानी जिल्हा सदस्य राधेशाम काबरा, सदासुख काबरा,डॉ प्रशांत काबरा, संतोष काबरा प्रदीप काबरा, धीरज काबरा,पंकज काबरा,मधुर काबरा,सारंगधर काबरा, सतीश सोमाणी, पुष्पक काबरा, संदीप काबरा, यांच्यासह सौ सूरजबाई काबरा,सौ चंदाबाई काबरा, सौ मंजूश्री काबरा, सौ शारदा काबरा,सौ वीणा काबरा, सौ सुरेखा काबरा, सौ मोनू लड्डद्,आदी उपस्थित होते.