पाचोरा ;- संपूर्ण जगात थैमान घातलेल्या नोवोल कोरोना (कोविड-१९) ह्या महामारी चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय जनता पार्टी पाचोरा-भडगाव व अमोलभाऊ शिंदे यांच्या संकल्पनेतून कै.परशराम कोंडीबा शिंदे बहुउद्देशीय मंडळ यांच्या माध्यमातून २७ मार्च म्हणजे सलग १६ दिवसांपासून दररोज पाचोरा-भडगाव शहरांत गरजूंना घरपोच जेवणाची व्यवस्था भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या हस्ते केली जात आहे.यासाठी नियोजनार्थ वेळोवेळी कृ.उ.बा.समिती सभापती बापूसो.सतिष शिंदे यांचे मार्गदर्शन मिळत आहे.
पाचोरा-भडगाव शहरातील हातावर पोट भरणाऱ्या कष्टकरी रोजंदारी कामगारांसाठी हा उपक्रम उपयुक्त ठरत असून यापुढे देखील हा उपक्रम असाच सुरू ठेवण्याचा संकल्प यावेळी अमोलभाऊंनी व्यक्त केला. ह्या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी भडगाव येथील भाजपा तालुकाध्यक्ष अमोल पाटील,मा.तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील,महेंद्र ततार,नरेंद्र पाटिल,योगेश शेलार,पप्पू पाटिल,हिरामण बाविस्कर,मनोज पाटील,रवि पवार,जहाँगिर,अमोल वाघ तसेच पाचोरा शहरात भाजपा शहराध्यक्ष रमेश वाणी, तालुका सरचिटणीस गोविंद शेलार शहर सरचिटणीस दिपक माने व राजेश संचेती,रामा जठार,सोहन मोरे,सागर मिसाळ, बापू निंबाळकर,रमेश पवार,हे संपूर्ण घरपोच वाटप व्यवस्था पाहात आहेत.