जळगाव (प्रतिनिधी ) ;- केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात येऊन खा. राहुल गांधी यांचा वाढदिवस जळगाव ग्रामीण तालुका काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष मनोज चौधरी यांच्या नेतृत्वात काँग्रेस भवन येथे साजरा करण्यात आला.
याप्रसंगी जमील शेख, प्रमोद घुगे, भाऊसाहेब सोनवणे, भिकन सोनवणे, सचिन माळी, संजय पाटील, सागर कुटुंबळे, समाधान पाटील, पुरुषोत्तम घु,गे अमजद पठाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.