यावल;- येथील तहसील कार्यालयासमोर यावल तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्रातील मोदी सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी खा. राहुल गांधी यांचा वाढदिवस संकल्प दिन म्हणून साजरा करण्यात आला. या आंदोलनात इंटकचे जिल्हा अध्यक्ष भगतसिंग देवनाथ पाटील , कॉंग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान, काँग्रेस अनुसुचित जातीच्या जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकला इंगळे, तालुका उपाध्यक्ष हाजी गफ्फार शाह, शहर उपाध्यक्ष अनिल जंजाळे, नगरसेवक मनोहर सोनवणे, राजु पिंजारी, युवक काँग्रेसचे सरचिटणीस इमरान पहेलवान, नईम शेख, हाजी अय्याज खान शब्बीर खान, नावरे येथील माजी सरपंच व सदस्य समाधान पाटील, काँग्रेस आदिवासी आघाडी तालुका अध्यक्ष बशीर तडवी, अजय बोरोले यांनी या केंद्र सरकार विरोधातील आंदोलनात सहभाग घेतला.