जळगाव – मार्चपासूनच म्युकरमायकोसिसचा फैलाव जिल्ह्यात सूरू झाला आणि खळबळ माजली. पण डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय रुग्णालयातील तज्ञांनी हे आव्हान स्विकारत मार्चपासूनच उपचारांसह शस्त्रक्रियांना सुुरुवात झाली. आतापावेतो ५० रूग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करत रूग्णांना दिलासा दिला आहे.
मार्चच्या सूरूवातीस या आजाराची लक्षणे दिसू लागताच शेकडो रूग्णांनी कान नाक घसा तज्ञांकडून तपासणी केल्यावर पुढील उपचारासाठी डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात दाखल होण्यास सूरूवात झाली होती. यातील काही रूग्णांना प्राथमिक स्तरावर आजाराची सूरूवात असल्याने औषधीच्या सहायाने यशस्वी उपचार करून घरी पाठवण्यात आले तर अनेक रूग्णांवर अत्याधुनिक मायक्रोस्कोप व एम.आर.आय, सी.टी स्कॅनच्या सहायाने आजाराचे स्वरूप व निदान करण्यात येऊन शस्त्रक्रियेचा सल्ला दिला गेला. गेल्या तिन महिन्यात जवळपास ५० रूग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया देखिल करण्यात आलेल्या आहे.
कोविड,म्युकरमायकोसिस रूग्णांना दिलासा
येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयात लागू असलेल्या महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून कोविड व म्युकरमायकोसिसच्या रूग्णांवर मोफत उपचार होऊन दिलासा मिळाला आहे.
मागील वर्षी कोविड आजाराने जगभर थैमान माजवले तसे भारतातही ह्या आजाराने हाहाकार माजवला. अशातच या आजारावर उपचारासाठी लाखोंचा खर्च लागत असल्याने सामान्य व गरीबांना पैश्याअभावी जिव गमवायची भिती निर्माण होत असतांना सरकारने महात्मा फुले जनआरोग्य योजनेत या आजाराचा समावेश केल्याने मोफत उपचार मिळू लागले. तसेच या वर्षी देखिल म्युकरमायकोसिस आजाराची सूरूवात झाली. या आजारातही महागडी इंजेक्शन व उपचार पध्दतीमूळे आजार बळावून जिवावर बेतू लागल्याने हा आजारही या योजनेत सहभागी केल्याने रूग्णांना दिलासा मिळाला आहे. डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय हे या दोन्ही आजारासाठी शासनाने अधिग्रहीत केले. गेल्या वर्षभरात जवळपास ७००० च्या वर कोविड रूग्णांनी उपचाराचा लाभ घेतला.
अशी आहे टीम
कान नाक घसा विभागात टास्कफोर्स सदस्या डॉ. अनुश्री अग्रवाल, डॉ. विक्रांत वझे, डॉ. पंकजा बेंडाळे, सहकारी डॉ. हर्षल महाजन, डॉ. श्रुती आर एम ओ डॉ. विष्णु नागुलकर, यांचेसह मुख व कर्करोग तज्ञ डॉ. अनुज पाटील, फिजीशियन डॉ. पाराजी बाचेवार, डॉ. सी डी सारंग आदि सेवा देत आहे.
रूग्णालयाची सेवा उच्च दर्जाची — रमाबाई खैरे
मे महिन्यात रूग्णालयाच्या सेवा सुविधाबाबत पाचोरा येथील रमाबाई खैरे या महिला रुग्णाच्या नातेवाईकाने मा. जिल्हाधिकारी साो यांचेकडे इंजेक्शन देत नाही, तसेच सेवा सुविधाबाबत प्रश्नचिन्ह उभे केले होते. परंतू शासकिय महाविद्यालयात कोविड रूग्ण असल्याने परत डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयात पाठवल्यावर या रूग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली असून मिळणारी सेवासुविधा उच्च दर्जाची असून याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.