जळगाव ( प्रतिनिधी ) ;- शहरातील अजिंठा चौफुलीजवळ पहुरकडून जळगावकडे येणारी आयशर ट्रक आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास उजव्या बाजूला पलटी झाल्याने यात मडके , लोणचे बरणी विक्रेता राजेश शहा यांचे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान या घटनेत कुणाचीही जीवित झणी अथवा जखमी झाल्याची घटना सुदैवाने घडली नाही . या अपघातामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता.








