भुसावळ (प्रतिनिधी) :- जळगाव येथे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा व्यवसाय करणारे दोघे भाऊ काम आटोपून दुचाकीने घरी भुसावळला येत होते . गुरुवारी रात्री १०.४५ वाजेच्या सुमारास महामार्गावरील ट्रॅक्टरच्या शो – रूमजवळ भरधाव डंपरला धडकल्याने दोन्ही तरूण भावांचा मृत्यू झाला . हे दोघे भुसावळातील सिंधी कॉलनीतील रहिवासी होते . मनीष सुरेशकुमार दरडा आणि रितेश सुरेशकुमार दरडा अशी दोघांची नावे आहेत








