मुंबई (वृत्तसंस्था) – राम मंदिरासंदर्भात ‘सामना’त केलेल्या टीकेवर काल भाजपने शिवसेना भवनासमोर निषेध आंदोलन केले. त्यावेळी शिवसेनेचे कार्यकर्तेही तिथे जमले आणि दोन्ही गटात तुफान राडा झाला. यावरून शिवसेनेनं सामनातून उत्तर दिलं. आता भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
अतुल भातखळकर म्हणाले,’जनता इटालियन लोटांगण घालू, सुपारीबाज रामद्रोह्यांचे ‘राम नाम सत्य हैं’ केल्याशिवाय राहणार नाही. तसेच त्यांनी आणखी एक ट्विट केलं असून, शिवसेनेने सामना बंद करून, बाबरनामा काढावा.’ असं म्हणत त्यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.