जाफ्राबाद (प्रतिनिधी ) जाफराबाद येथे दोन पीएसआय आणि तीन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या पोलिसांची काहीच चूक नसताना त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे या सर्वांचे निलंबन मागे घेण्यात यावे, अशी मागणी गोंधनखेडा येथील माजी पोलीस अधिकारी दीपक बोऱ्हाडे यांनी औरंगाबाद परीक्षेञाचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री. प्रसन्ना यांना निवेदनाद्वारे केली आहे. तडकाफडकी निलंबन करण्याचा निर्णय चूकीचा असून, पोलीस दलाचे मनोबल खच्चीकरण करणारा आहे. असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.








