जळगाव – गोदावरी संगीत महाविद्यालयाचया वतीने दरवर्षाप्रमाणे यंदाही मृगोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात ‘ये रे घना’, ‘मेघा रे मेघा’, ‘बरसो रे मेघा’ यासारख्या गीतांनी रसिक चिंब झाले. कार्यक्रम सुरु असतांना बाहेरही पावसाचे आगमान झाले होते त्यामुळे जणुकाही खरोखरच आपणही पावसाच्या सरींमध्ये चिंब भिजत असल्याचा अनुभव आला. मन प्रसन्न करणारे गायन, नृत्य व हार्मोनियम आणि त्याला तबला वादनाची सुरेल जोड मिळाल्याने मृगोत्सव उत्तरोत्तर बहरत गेला.
गोदावरी संगीत महाविद्यालयाच्या वतीने १५ जून रोजी सायंकाळी ५ वाजता गुगल मिटवर कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, संचालिका डॉ.वर्षा पाटील, गोदावरी संगीत महाविद्यालयाच्या प्राचार्या पद्मजा नेवे कथ्थक विभाग प्रमुख डॉ.महिमा मिश्रा, प्रविण महाजन, देवेंद्र गुरव, सुशिल महाजन, राजु पाटील आदि उपस्थीत होते. कार्यक्रमाची सुरुवात श्रद्धा चौधरी, वेदश्री चौधरी ह्यांनी कथ्थक नृत्याद्वारे गणेश वंदनेने झाली. गायन विभागाच्या विद्यार्थ्यांनी ‘ये रे घना’, ‘अंगणी माझ्या मनाच्या’, ‘आनेवाला पल जानेवाला’ है हे गित अनुक्रमे पियुषा नेवे, संहिता जोशी, ऋतुराज जोशी यांनी सादर केली. तर राग दुर्गावर आधारित हार्मोनियम वादन सिद्धी पाटील, सुनिल चौधरी यांनी तर संवादिनीवर ‘पल पल दिल के पास’ गीत सादर केले.
तसेच कथ्थक विभागाचे बाल कलाकार कनकश्री अय्यंगर व खुशी वाणी यांनी ‘मेघा रे मेघा’ हे या गाण्यावर बहारदार नृत्य सादर केले. तसेच ‘बरसो रे मेघा’ या गाण्यावर दर्शना वर्मा, मालविका नेवे, साक्षी शिरसाठ, सानिका पाटील यांनी सुरेल असे समुहनृत्य सादर केले तर तबला विभागातील कुणाल गजाकुश यांनी तीन ताल व त्यांचे पलटे सादर केले. गायन विभागातील विद्यार्थ्यांनी ‘दिल झुम झुम करे’ हे गीत संस्कृती घुगे तर ‘झिलमिल सितारो का हे गीत दिक्षा इंगळे यांनी तर ‘ऐ री पवन’ गीत वर्षा कुळकर्णी यांनी आपल्या सुमधुर आवाजात सादर केले. प्रास्ताविक भुषण खैरनार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी जोशी यांनी केले. या कार्य्रमात महाविद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद व पालकांनी ऑनलाईनद्वारे हजेरी लावत मृगोत्सवाचा आनंद लुटला.








