जळगाव (प्रतिनिधी ) ;- शहर बहुजन मुक्ती पार्टी व सहयोगी संघटनातर्फे गॅस, डिझेल, पेट्रोल खाद्य तेल, वीजबीलासह जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढी विरोधात मंगळवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालया समोर ‘दे धक्का’ आंदोलन करण्यात आले.
आंदोलन हे स्वातंत्र्य चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत विविध घोषणाबाजी करून मोर्चा काढण्यात आला. यात बहुजन मुक्ती पार्टी युवा, महिला आघाडी सहभागी होणार आहे. बैलगाडी, सायकल, मोटारसायकल, रिक्षा व चारचाकी वाहने स्वातंत्र चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ढकलत नेऊन केंद्र व राज्य सरकारच्या धोरणा विरोधात हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष विजय सुरवाडे, सुमित्र अहिरे, अमजद रंगरेज, इरफान शेख, अलीम शेख आदी सहभागी झाले होते.








