महापौर जयश्री महाजन यांचे आदेश
जळगाव;- येथील प्रभाग समिती क्र. 1 मधील ममुराबाद रोडवरील रेल्वेपुलाखालील नाला सफाईसह गाळ, अडकलेली झाडेझुडपे पोकलँडच्या सहाय्याने काढण्याच्या कामाला गेल्या महिन्यात महापालिकेतर्फे सुरवात झाली. संबंधित गाळ मक्तेदाराने नाल्यातून काढून नेला. मध्यंतरी महापालिकेने नाल्याकाठी संरक्षक भिंत बांधली होती. मात्र, त्यातील काही बांधकाम वेस्ट मटेरिअल हे संरक्षक भिंत बांधून झाल्यानंतरही नाल्याकाठी पडून होते. यासंदर्भात नगरसेवक श्री.किशोर बाविस्कर यांनी महापालिकेकडे वारंवार पाठपुरावा केला. ही माहिती महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांनाही कळाल्याने आज दुपारी त्यांनी महापालिका अधिकार्यांसह ममुराबाद नाक्यानजीक लेंडीनाल्याकाठी जाऊन पाहणी केली. यावेळी संरक्षक भिंतीचे संबंधित वेस्ट मटेरिअल व घाण काठावरच पडून असल्याचे त्यांनी पाहिले. त्यावर त्यांनी महापालिका आयुक्तांशी संपर्क करून संबंधित अधिकार्यांना वेस्ट मटेरिअल व घाण उचलण्यासाठी पटकन नवा मक्तेदार नियुक्तीसाठीची निविदा प्रक्रिया राबवून पावसाला सुरूवातहोण्यापूर्वी नाल्यासह काठाचा संपूर्ण भाग स्वच्छ करावा, असा आदेश दिला.
नगरसेवक.नवनाथ दारकुंडे, किशोर बाविस्कर, प्रभाग अधिकारी राजेंद्र पाटील, अभियंतामिलिंद जगताप यांच्यासह महापालिका कर्मचारी व परिसरातील नागरिक यावेळी उपस्थित होते. महापौर जयश्री महाजन म्हणाल्या, की महापालिकेद्वारे दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील सर्व लहान-मोठ्या नाल्यांच्या सफाईसह तेथील झाडेझुडपे काढून ते प्रवाही करण्याचे काम हाती घेतले जाते. या पार्श्वभूमीवर मागील महिन्यात शहरातील चारही प्रभाग अधिकार्यांसमवेत शहरातील लहान-मोठे नालेसफाईच्या कामांचा आढावा घेतला. त्यानंतर या कामांना प्रत्यक्ष सुरूवात झाली. त्यात नाल्याच्या सफाईसह त्यातील गाळ, प्लास्टिक पिशव्या, कचरा, झाडेझुडपे काढून तोे प्रवाही करण्याची प्रक्रिया सुरू झाली. या स्वच्छतेसह नाल्याकाठच्या परिसरातील रहिवाशांना डास, मच्छरचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी कीटकनाशके टाकून फवारणीही केली गेली. दरम्यान, मध्यंतरी महापालिकेने नाल्याकाठी संरक्षक भिंत बांधली होती. मात्र, त्यातील काही बांधकाम वेस्ट मटेरिअल हे संरक्षक भिंत बांधून झाल्यानंतरही नाल्याकाठी पडून होते. हा प्रकार मलाही माहिती झाल्याने दुपारी मी महापालिका अधिकार्यांसह ममुराबाद नाक्यानजीक लेंडीनाल्याची पाहणी केली. यावेळी संबंधित संरक्षक भिंतीचे वेस्ट मटेरिअल व घाण काठावरच पडून असल्याचे दिसले. त्यामुळे महापालिका आयुक्तांशी तत्काळ संपर्क करून संबंधित अधिकार्यांना वेस्ट मटेरिअल व घाण उचलण्यासाठी पटकन नवा मक्तेदार नियुक्तीसाठीची निविदा प्रक्रिया राबवून पावसाला सुरूवातहोण्यापूर्वी नाल्यासह काठाचा संपूर्ण भाग स्वच्छ करावा, असा आदेश दिला. त्यामुळे हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल.