जळगाव;- एमआयडीसी परिसरात बांधकाम साहित्य चोरणाऱ्या चौघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता कोठडी सुनावण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , स्पैरोधारा इन्फास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने घेतले आहेत. मानराज मोटर शोरुमजवळ १३ जून रोजी पहाटेच्या सुमारास बांधकाम साहित्याची यात ५० हजाराच्या १० लोखंडी प्लेट, २ हजार ७०० रुपयांचे ९ युजॅक, १ हजार ८०० रुपयांचे ३ एम.एस.पाईप, ४० हजार रुपये किंमतीचे १० क्रीप्स असे साहित्य लंपास झाले होते. कंत्राटदार शेख रफिक शेख रऊफ यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता.
बांधकामाचे चोरीचे साहित्य सागर जाधव वय १९ रा. रामेश्वर कॉलनी व धिरज ठाकूर वय २१ रा. श्रीकृष्ण नगर हे विक्री करण्यासाठी सुप्रिम कॉलनीतील भंगाराच्या दुकानावर येत असल्याची गुप्त माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, किशोर पाटील, चेतन सोनवणे, मुकेश पाटील, सुधीर साळवे, असीम तडवी, मुदस्सर काझी, सचिन पाटील यांच्या पथकाने चोरीचा माल विकताना सागर जाधव व धिरज ठाकूर या दोघांना रंगेहाथ पकडले होते. त्यांनी हे साहित्य भंगार व्यावसायिकांना विकल्याची कबूली दिली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने पुर्नवासी पाल्हाद पासवान वय ४० रा. आनंद बॅटरी शेजारी, गोपाल दाल मिल समोर, एमआयडीसी व इम्रान सादीक खाटीक वय ३० रा. मोहम्मदीया नगर, गुलाब बाबा कॉलनी, जळगाव या दोघा भंगार व्यावसायिकांना अटक केली . चारही संशयित आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.