जळगाव ;-रावेर तालुक्यातून दुचाकी चोरणाऱ्या दोघांना शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱयांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहे. त्यांच्यकडून आणखी दुचाकी जप्त करण्यात येणार आहे.
शाहरुख खाटीक (वय-२५, रा.तंबापूर) आणि फारुख शेख (वय-३२,रा. राजा कॉलनी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. दोघांना तांबापुरा येथून अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातील चोरीच्या पाच दुचाक्या रावेर तालुक्यातुन जप्त करण्यात आले आहे. दोन्ही संशयित आरोपींवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पत्रकारांना उपअधीक्षक कुमार चिंथा, पोलीस निरीक्षक धंनजय येरुळे यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.