जाफ्राबाद/(प्रतिनिधी) वाळू तस्करीची बातमी का छापली म्हणत पत्रकार तथा जाफ्राबाद तालुका मराठी पत्रकार संघाचे सचिव ज्ञानेश्वर माऊली पाबळे आणि अन्य सहकार्यांना लाठ्या-काठ्या व लाता बुक्कयांनी बेदम मारहाण करणारा एक वाळूमाफिया आणि ८ जणांविरुद्ध जाफ्राबाद पोलीस ठाण्यात 307 आणि पत्रकार संरक्षण कायदा आणि विविध कलमाखाली रविवारी13 रोजी गुन्हे दाखल करण्यात आहेत. दरम्यान या गुन्ह्यातील आरोपींच्या मुसक्या आवळून कठोर शिक्षा करण्याची मागणी पत्रकार संघ आणि तालुक्यातील विविध पक्ष, संघटनानी केली आहे.याविषयी अधिक माहिती अशी कि ज्ञानेश्वर पाबळे यांनी काही दिवसांपासून वाळू माफियांविरूध्द अनेकदा वृत्त प्रकाशित केले होते.या गोष्टीचा राग धरून वाळू तस्कर कृष्णा सिरसाट, अमोल सिरसाट, राहुल मोहन जाधव, धनराज दौलत जाधव, तान्हाजी पांडुरंग जाधव, गणेश गजानन जाधव, भागवत तान्हाजी जाधव, विशाल मोहन जाधव यांनी शुक्रवारी ता.11 श्री पाबळे यांच्या जाफ्राबाद येथील ऑनलाईन सेंटरवर जाऊन जबर हल्ला केला.श्री पाबळे यांच्या बचावासाठी पुढे आलेल्या सतीश मुठ्ठे आणि विलास पाबळे,अंकुश मिचके यांच्यावर हि टॉमी, फायटर ने हल्ला केला,दुकानातील कॉम्पुटर, प्रिंटर, अन्य साहित्य याची तोडफोड केली.दुकानाच्या गल्यातील रोख 35 हजार 300 रुपये हि काढून घेतले
या मारहाणीत श्री पाबळे यांच्यासह सतीश मुठ्ठे, विलास पाबळे, अंकुश मिचके हे देखील जखमी झाले होते.श्री पाबळे यांना जालना येथील शासकीय रुग्णालय आणि नंतर औरंगाबाद येथील घाटीत उपचार करण्यात आले.सदर घटनेचे तपासी आधिकारी सपोनि ज्ञानेश्वर पायघन यांनी शनिवारी ता.12 औरंगाबाद येथे दवाखान्यात जाऊन जवाब नोंदविला.सदर जवाबाच्या आधारे पोलिसांनी फिर्याद नोंदवली आहे. मारहाण करणारे कृष्णा पंजाब सिरसाट, अमोल पंजाब सिरसाट, राहुल मोहन जाधव, गणेश गजानन जाधव, विशाल मोहन जाधव, भागवत तान्हाजी जाधव, धनराज दौलत जाधव, तान्हाजी पांडुरंग जाधव यांच्याविरुद्ध भादंवि 307, 324, 143, 147, 148,149, 327,506, 135 व कलम 4 पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दरम्यान चोरटी वाळू वाहतूक करून मस्तवाल झालेल्या वाळू माफियांनी दहशत, मुजोरी पुन्हा एकदा ऐरणीवर आली असून,तथाकथित वाळू माफिया आणि त्यांचे गावगुंड यांचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.