यावल;- तालुक्यातील डोंगर कठोरा येथील एका शेतमजुराने विहीरीत उडी घेवुन आत्महत्या केल्याची घटना आज घडली असून ,यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. भागवत बळीराम शिरोळे ( धनगर ) (वय ५५ वर्ष रा. डोंगर कठोरा ता. यावल ) असे मयताचे नाव आहे .
भागवत शिरोळे यांनी रविवार दि १३ जुने रोजी दुपारी १२.४५ वाजेच्या सुमारास खालचे गाव लगत शिवारातील शालीक रामचंद्र फिरके यांच्या शेतातील विहीरीत उडी घेवुन आत्महत्या केली. मयत भागवत शिरोळे याच्या मृत्यु पश्चात पत्नी व दोन मुले असुन कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. यावल पोलीसात अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे .