जळगाव (प्रतिनिधी ) ;- लाकडी फळी असलेल्या घराच्या फटीतून आतील कडी अलगद काढून गाढ झोपलेल्या दोन तरुणांच्या उशीजवळ असणारे दोन २० हजार रुपयांचे मोबाईल अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. हि घटना ममुराबाद रोडवरील लक्ष्मीनगर भागात घडली असून याबाबत शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.