जळगाव ( प्रतिनिधी ) मध्यप्रदेशात जोरदार पाऊस झाल्याने सकाळी हतनूर धरणाचे चार दरवाजे 1 मीटरने उघडण्यात आले होते. मात्र दुपारी १ वाजता ८ दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले असून तापी नदीपात्रात 23523 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहेत.
तरी हतनूर धरणाचे खालील गावांमधील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये कुणीही आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये. असे आवाहन हतनूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. महाजन यांनी केले आहे.