जळगाव ( प्रतिनिधी ) भुसावळ तालुक्यातील वराडसिम येथील सरपंच गीता प्रशांत खाचणे यांना तीन अपत्य असल्याने नाशिकचे अपर आयुक्त भानुदास पालवे यांनी अपात्र ठरवले आहे.
वराडसीम येथील अलका सपकाळे यांनी वराडसीम सरपंच गीता खाचणे यांना तीन अपत्य असल्याने त्यांना अपात्र ठरवण्याची मागणी केली होती. सपकाळे यांनी खाचणे यांना तीन अपत्य असल्याबाबत पुरावे सादर केल्यानंतर या प्रकरणी अपर आयुक्तांकडे सुनावणी झाली.
सपकाळे यांच्या तक्रारीत तथ्य आढळल्याने खाचणे यांना पदावरून अपात्र करण्याबाबतचे आदेश नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयाचे गटविकास अधिकारी राजेंद्र देसले यांनी काढले आहेत.