बोदवड :- गतवर्षी खरीपची ज्वारी शासकिय हमीभाव केंद्रावर खरेदी करण्यात आली होती. रब्बी व ऊन्हाळी ज्वारी मागील वर्षापासून शासकिय हमीभाव केंद्रांना खरेदी करण्याच्या सुचना शासनाने दिल्या आहेत. यांत ; तालूक्यात खरीप हंगामात ज्वारीची मोठ्या प्रमाणात लागवड होते तर ज्वारीच्या रब्बी हंगामाकडे शेतकर्यांची मागील वर्षा पाठ दिसून आली. यंदा शासकिय हमीभावानुसार ऊन्हाळी ज्वारी खरेदीसाठी सेल परचेस लिमिटेड कडे 38 शेतकर्यांनी नोंदणी केली असून हमीभाव 2650 इतका आहे. परंतू, यांत शासकिय हमीभाव केंद्रांना 100 क्विंटल ज्वारी खरेदीच्या मर्यादा दिल्याने बहुतांश शेतकर्यांना कवडीमोल भावात व्यापार्यांना ज्वारीची विक्री करण्याचे चिन्ह दिसत आहेत. जुन महिना उजाळल्यावर मुदतीच्या सिमा बांधून खरेदीला सुरवात झाली आहे. खरीप हंगामाची पेरणी सुरु झाली आहे. जमिनीची मशागत करायची कशी ?शासनाकडून मर्यादा वाढवून मिळावी अशी मागणी शेतकर्यांकडून होत आहे.
यासंदर्भात तालुक्यातील शेतकर्यांनी ज्वारी खरेदीची मर्यादा वाढविण्याची मागणी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. हितेशदादा पाटील यांच्याकडे केली होती. या प्रश्नावर त्यांनी मुंबई गाठत अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री विश्वजीत कदम यांची भेट घेतली. जिल्ह्यामधील तालूक्यांतील शासकिय हमीभाव केंद्रांना मर्यादा वाढवून मिळावी तसेच चालू स्थितीत मागील वर्षाची खरीप, रब्बी व ऊन्हाळी ज्वारी खरेदीचीही परवानगी मिळावी अशी मागणी केली आहे. या प्रकरणावर वैयक्तिक लक्ष घालणार असल्याचे मंत्री विश्वजित कदम यांनी सांगितल्याचे प्रा.हितेश पाटील यांनी कळविले.
कोरोनाच्या प्रादूर्भावामूळे यंत्रणा कोलमडल्याने बहुतांश शेतकर्यांची ज्वारी घरातच पडून आहे. तर काही शेतकर्यांनी शेतमाल विक्री केल्यानंतर शासनाकडून खरेदी सुरु झाली आहे. यांत आता 100 क्विंटल व फक्त ऊन्हाळी ज्वारी खरेदी होणार असल्याच्या मर्यादा दिल्याने शेतकर्यांसमोर संकट ऊभे आहे. या प्रकारामूळे खासगी व्यापाऱ्यांकडुन लुट , शासनाकडून अद्याप ज्वारी पुर्णपणे खरेदी करण्यात आले नसल्याने शेतकऱ्यांची नड पाहून खासगी व्यापारी हमीभावापेक्षा कमी भावाने धान्य खरेदी करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. वास्तविक हमीभावापेक्षा कमी दराने धान्य खरेदी करू नये असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत.