जळगाव ;- बेवारस स्थितीत सापडलेली वाहने महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ८२ प्रमाणे जप्त करण्याचे अधिकार पोलीसांना आहेत. त्यानुसार भुसावळ उपविभागातील सर्व पोलीस स्टेशनमध्ये अशी बेवारस वाहने जप्त करण्यात आलेली आहे. सदरची वाहने त्यांच्या मुळ मालकांना परत
देणेकामी त्यांचा मालकांचा सर्वोतोपरी शोध घेण्यात येवूनही त्यांचे मुळ मालक मिळून आले नाही. त्यामुळे अशी ही जप्त बेवारस वाहने वर्षानुवर्ष पोलीस स्टेशनच्या आवारात जीर्ण / बंद अवस्थेत पडून आहेत.अशा वाहनांचा लिलाव १६ जून रोजी सकाळी १० वाजता पोलीस वसाहत आर.पी.डी.रोड भुसावळ येथे घेण्यात येणार आहे.
वाहनांची संख्या खालील प्रमाणे-
भुसावळ बाजारपेट पो.स्टे. ७० बेवारस वाहने
भुसावळ शहर पो.स्टे. ०५ बेवारस बाहने
भुसावळ तालुका पो.स्टे. १० बेवारस वाहने
नशिराबाद पो.स्टे. ४० बेवारस वाहने
१३.०६.२०२१ पर्यंत प्रभारी अधिकारी भुसावळ शहर यांचे कडे वा प्रभारी अधिकारी, नशिराबाद पो.स्टे. यांचेकडे लेखी
अर्ज आपले कडिल परवाना पत्रासह करावा.असे आवाहन करण्यात आले आहे.