जळगाव ( प्रतिनिधी ) ;- शहरातील मनपातर्फे कचरा गोळा करण्यासाठी असलेल्या घंटागाड्यांमध्ये खाद्यपदार्थांचा कचरा वेगळा ठेवण्याची व्यवस्था करावी अशी मागणी रिद्धी जानव्ही फाउंडेशनच्या चित्रलेखा मालपाणी यांनी मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे. शिळे अन्नपदार्थ,उरलेले अन्नपदार्थ वेगळे जमा केल्यास गोशाळेत पाठवून ते गुरांना खाद्य म्हणून वापर होईल. तसेच अन्नाची नासाडी थांबेल असेही निवेदनात म्हटले आहे.