नाशिक ;- कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर 14 जून 2021 रोजी होणारी विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची बैठक होणार नसल्याचे विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे सदस्य सचिव तथा उपआयुक्त (महसुल) गोरक्ष गाडीलकर यांनी एका शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
प्रसिध्दी पत्रकात नमूद केल्यानुसार, कोरोना विषाणुच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी राज्य शासनाने प्रशासकीय कार्यक्रम घेण्यासंदर्भात निर्बंध घातले असल्याने विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीची बैठक होणार नसल्याचे नमुद केले
नाशिक विभागातील नाशिक, अहमदनगर,धुळे, जळगांव आणि नंदुरबार येथील नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहनही विभागीय भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे सदस्य सचिव तथा उपआयुक्त (महसुल) गोरक्ष गाडीलकर यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.