जळगाव (प्रतिनिधी ) ;-वरणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाळू वाहतूक करणारे डंपर सोडविण्याच्या मागणीसाठी येथील पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षकासह कॉन्स्टेबलला १० हजारांची लाच स्वीकारताना जळगावच्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे. पोलीस उपाधीक्षक सतीश भामरे यांची हि रुजू झाल्यानंतरची पहिली कारवाई आहे.


सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, तक्रारदार- पुरुष,वय-30, रा.साकेगाव ता.भुसावळ, जि.जळगाव यांनी आरोपी पोलीस उप निरीक्षक सुनिल जगन्नाथ वाणी, वय-५६ रा.भिरूड कॉलनी,जळगाव रोड,भुसावळ ता.भुसावळ जि.जळगाव याला तक्रारदार यांच्या मालकीचे डंपर क्रं.एम.एच.40 एन 4086 हे असुन सदर डंपर वरणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वाळू वाहतूक करतांना त्या वाहनावर करवाई न करण्याच्या मोबदल्यात पंचासमक्ष १० हजार लाचेची मागणी केली. त्यानुसार पोकॉ गणेश महादेव शेळके, वय-३१, रा.पोलीस वसाहत,वरणगाव ता.भुसावळ, जि.जळगाव यांनी १० हजारांची लाच स्वीकारली. या दोघांना जळगावच्या लाचलुचपत विभागाने सापळा रचून अटक केली.
यांनी केली कारवाई
पोलीस उप अधीक्षक सतीश डी.भामरे, पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, पोनी लोधी,सफौ.दिनेशसिंग पाटील,पोहेकॉ.अशोक अहीरे, पोहेकॉ.सुनिल पाटील, सफौ.सुरेश पाटील, पोहेकॉ.रविंद्र घुगे, पोना.मनोज जोशी, पोना.सुनिल शिरसाठ, पोना.जनार्धन चौधरी, पोकॉ.प्रविण पाटील, पोकॉ.नासिर देशमुख, पोकॉ.ईश्वर धनगर, पोकॉ.प्रदिप पोळ,पोकाॅ.महेश सोमवंशी आदींनी हि कारवाई केली .







