जळगाव(प्रतिनिधी ) ;- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २२ व्या वर्धापनदिनानिमित्त आज पक्षाच्या जिल्हा कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील आदींसह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .