जामनेर ;– महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे खाजगीकरण त्वरित रद्द करा अशी मागणी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ यांच्यातर्फे देण्यात आले.
निवेदन देते वेळेस उपस्थित अरुण जोहरे(असंघटित बांधकाम कामगार शाखा महाराष्ट्र),भास्कर जोहरे (सामाजिक संघटना), विश्वास साबळे (भारतीय युवा मोर्चा जिल्हा प्रचारक), राहुल सपकाळे ( भारतीय बेरोजगार मोर्चा जळगाव जिल्हा अध्यक्ष), प्रमोद विसवे ( राष्ट्रीय किसान मोर्चा जामनेर तालुका अध्यक्ष ), मधुकर जोहरे (राष्ट्रीय अन्याय अत्याचार निवारण संघ), धनराज चव्हाण (राष्ट्रीय गोर बंजारा क्रांती संघ राज्य उपाध्यक्ष) मयुर पाटील (छत्रपती क्रांती संघ जामनेर तालुका अध्यक्ष), राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ व महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अशा आठ संघठनांनी मिळुन जामनेर येथील तहसीलदार व बस आगार प्रमुखांना खाजगीकरणाच्या विरोधात काही महत्त्वपुर्ण मागण्यांना घेऊन निवेदन दिले.