नागपूर ( प्रतिनिधी ) ;- भारताचे माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव आणि माजी संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहिलेले राम खांडेकर यांचे निधन झाले. काल(8 जून) रात्री नागपूरमधील घरी 87व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात मुलगा मुकुल, सून संगीता आणि दोन नातवंड गौरंग आणि जान्हवी आहेत.
राम खांडेकर यांना 1985 मध्ये नरसिंहराव यांनी तत्कालीन रामटेक मतदारसंघाच्या व्यवस्थापनाचे काम पाहण्यासाठी बोलवले. पुढे, 1991 मध्ये जेव्हा राव पंतप्रधान झाले, तेव्हा खांडेकर हे त्यांचे ओएसडी म्हणून पाहू लागले. खांडेकर यांनी राव यांच्या बरोबर त्यांच्या निधनार्यंत काम केले. राव यांच्याशिवाय खांडेकर यांनी माजी केंद्रीय संरक्षण मंत्री आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे खाजगी सचिव म्हणूनही काम पाहिले.