नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) केंद्र सरकार राज्यांना आणि केंद्र शासीत प्रदेशांना लोकसंख्या, बाधित रुग्णांची संख्या, लसीकरणाची टक्केवारी या आधारावर लसी पुरवल्या जातील. यामध्ये लस वाया जाण्याची टक्केवारी याचा विचार केला जाईल. केंद्र सरकार राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना 21 जूनपासून मोफत लस पुरवठा करणार आहे. ही लस नागरिकांना शासकीय रुग्णालयातून दिली जाईल.
18-44 वयोगटातील लसनिर्मिती कंपण्यांकडून एकूण उत्पन्नाच्या 75 टक्के लसी भारत सरकार खरेदी करुन, राज्य सरकारांना मोफत देणार. आतापर्यंत देशातील अनेक नागरिकांना मोफत लस मिळाली आहे. आता 18 वर्षावरील लोकांनाही मोफत लस मिळणार आहेत. केंद्राकडून राज्यांना किती लसी पुरवण्यात येणार आहेत याची माहिती अगोदर देण्यात येणार आहे.