नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) ;- भारत बायोटेकची कोवॅक्सिन लस घेतलेल्या नागरिकांना प्रवेश देण्यास काही देशांनी नकार दिला होता. मात्र, कोवॅक्सिन लस घेतलेल्या नागरिकांसाठी मोठी बातमी आहे. त्यांचा परदेशातील प्रवासाचा मार्ग सुकर होऊ शकतो. कारण, कोवॅक्सिन लसीचा जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीत समावेश करण्यासाठी अर्ज करण्यात आला आहे. जुलै ते सप्टेंबर दरम्यान या विषयी निर्णय जाहीर होऊ शकतो.
कोरोना विषाणू संसर्गानंतर परदेशात प्रवास करायचा असल्यास लस घेणे अनिवार्य करण्यात आलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना लसींची यादी तयार केलेली आहे. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीत कोवॅक्सिन लसीचा समावेश नसल्यानं ती लस घेतलेल्यांपुढं अडचण निर्माण झाली होती.